Loksabha 2019 : बीड मध्ये "शिवसंग्राम'चे वजन राष्ट्रवादीच्या पारड्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

देशाची मान उंचावण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करावे, मराठा समाजाला न्याय देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करावे, यासाठीच काम करणार आहे. त्यासाठी राज्यात आणखी दोन खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. पण, जिल्ह्यात स्वाभिमानाची लढाई शिवसंग्राम लढत असून, "शेतकरी पुत्राला साथ द्या' अशी घोषणा विनायक मेटे यांनी गुरुवारी (ता. 11) केली.

बीड - देशाची मान उंचावण्याचे काम करणाऱ्या नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचे नेतृत्व करावे, मराठा समाजाला न्याय देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करावे, यासाठीच काम करणार आहे. त्यासाठी राज्यात आणखी दोन खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. पण, जिल्ह्यात स्वाभिमानाची लढाई शिवसंग्राम लढत असून, "शेतकरी पुत्राला साथ द्या' अशी घोषणा विनायक मेटे यांनी गुरुवारी (ता. 11) केली. या वेळी त्यांच्या समर्थकांनीही "जय बजरंग' अशा घोषणा दिल्या. या वेळी मेटे यांनी हातातील घड्याळ उंचावत "तुम्ही सुज्ञ आहात, घ्यायचा तो बोध घ्या आणि धडा शिकवा,' असे आवाहन समर्थकांना केले. राज्यभर महायुतीत असलेल्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामची ताकद जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पारड्यात असणार, हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Shivsangram NCP Politics