Loksabha 2019 : आम्हाला मतदानाचा हक्क नाही, तुम्ही मात्र बजावाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने प्रत्येक जण निवडणुकीची चर्चा करत आहे. यात आम्हाला मतदानाचा हक्क नसला म्हणून काय झाले, तुम्ही मात्र हक्क बजावाच, असा संदेश देत दोघा बहीण-भावांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने प्रत्येक जण निवडणुकीची चर्चा करत आहे. यात आम्हाला मतदानाचा हक्क नसला म्हणून काय झाले, तुम्ही मात्र हक्क बजावाच, असा संदेश देत दोघा बहीण-भावांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. 

शहरात सध्या प्रचंड तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानात निवडणुकीचा प्रचारही सुरू झाला आहे. या प्रचाराच्या धामधुमीत न्यू नंदनवन कॉलनी येथील लोकेश बनसोडे व हर्षा बनसोडे या दोघा भावंडांनी आपल्या सायकलवर ‘छोडो अपने सारे काम! पहिले चलो करे मतदान’ असे घोषवाक्‍य लिहून मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्हाला मतदानाचा अधिकार नाही; मात्र संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराची आम्हाला जाणीव आहे, अशी भावना व्यक्त करून या चिमुरड्यांनी मतदान का आवश्‍यक आहे, हे सांगण्याची मोहीम सुरू केल्याने नागरिक कुतूहलाने त्यांच्याकडे बघत आहेत. 

लहानग्या वयातील ही मतदान जागृती मतदारांमध्ये झाली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Voting Child Publicity