औरंगाबादची जागा काँग्रेसकडेच राहणार - नितीन राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - लोकसभेची औरंगाबादची जागा काँग्रेसकडेच हवी. याबाबत राष्ट्रीय अध्यक्षांनादेखील सांगणार असल्याचे काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी (ता. २७) सांगितले.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची श्री. राऊत यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की काँग्रेसतर्फे संविधान स्वाभिमान हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात देशभर आरएसएसचे विचार कसे देशविघातक आहेत, याबद्दल माहिती दिली जात आहे.

देशातल्या ८४ राखीव जागांपैकी सध्या सात लोकसभेच्या जागा काँग्रेसकडे आहेत. यापैकी ६० जागांवर सध्या काम सुरू असून, ३५ जागा काँग्रेसला मिळतील, असा विश्वास श्री. राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष नामदेव पवार, बाबा सिद्दीकी, पवन डोंगरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Aurangabad Seat Congress Nitin Raut Politics