LokSabha2019 : मनसेचा पाठिंबा कोणाला? राज ठाकरेंना पाठवली नावे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात मनसे युतीच्या उमेदवारांच्या पराभवासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी पाठिंबा कुणाला द्यायचा, असा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार सुभाष झांबड आणि हर्षवर्धन जाधव यांची नावे राज ठाकरेंकडे पाठवण्यात आली आहेत.

औरंगाबादेत गुरुवारी (ता. 4) सायंकाळी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. युतीच्या पराभवासाठी राज ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच गुढी पाडव्याच्या मुंबईतील सभेला जिल्ह्यातून 200 चारचाकी नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीला जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विजय चव्हाण, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, सतनामसिंग गुलाटी, राजीव जावळीकर, मंगेश साळवे आदींची उपस्थिती होती. 

Web Title: MNS Supports to whom Raj Thackeray send their Names