Loksabha 2019 : शरद पवारांची मान खाली जाईल, असे कृत्य करणार नाही : सतीश चव्हाण  

Ncp leader Satish Chavan says not contest loksabha election in Aurangabad
Ncp leader Satish Chavan says not contest loksabha election in Aurangabad

लोकसभा 2019 :
औरंगाबाद : गेल्या चार लोकसभा निवडणुकीत पराभव होत असल्याने यावेळी राष्ट्रवादीला जागा सोडावी, अशी मागणी झाल्यानंतर आपण सहा महिल्यांपासून तयारीला लागलो होतो. मात्र, ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. दरम्यान, आमचे नेते शरद पवार यांची मान खाली जाईल, असे कुठलेही कृत्य मी करणार नाही. मित्रपक्ष म्हणून आघाडीचा धर्म पाळणार आहे, असे आमदार सतीश चव्हाण यांनी येथे जाहीर केले. 

काँग्रेसने शनिवारी (ता. 23) येथील उमेदवारी आमदार सुभाष झांबड यांना बहाल केली. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी तर कुठल्याही परिस्थितीत आपण अपक्ष लढणार असल्याचे खुलेआम सांगितले आहे. रविवारी (ता.24) आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या काही नेत्यांच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळेच येथे आयत्यावेळी उमेदवार देण्याची परंपरा आहे. त्यामुळे आतापर्यंत पराभव पत्कारावा लागलेला आहे. राष्ट्रवादीला ही जागा सुटेल, असे संकेत होते. त्यामुळे विविध जाती समूहातील मंडळींना एकत्र आणले होते. तसेच सर्व समाज घटकांनी आपल्याला बळ देण्याचे मान्य केले होते. जोपर्यंत राष्ट्रवादीचा ए. बी. फॉर्म मिळत नाही, तोपर्यंत आपण स्वत:ला उमेदवार म्हणणार नाही. त्यामुळे आपण आघाडीचा धर्म पाळणार असून काँग्रेसचे उमेदवार झांबड यांच्यासाठी काम करणार आहे. 

आपणास उमेदवारी न मिळाल्याने समर्थक तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या भावना देखील तीव्र होत्या. असे असले तरी बंडखोरी किंवा अपक्ष असा मार्ग निवडणे, हे आमच्या स्वभावात नाही. 
पत्रकार परिषदेनंतर हडकोतील राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काशीनाथ कोकाटे, अभय चिकटगावकर, अभिजित देशमुख, नविनसिंग ओबेरॉय, दत्ता भांगे, अक्षय पाटील, शैलेष सुरासे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com