भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडेंच्या उमेदवारीवर आक्षेप

भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडेंच्या उमेदवारीवर आक्षेप

बीड: भाजपच्या खासदार तथा लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र उमेदवार कालिदास आपेट यांनी अक्षेप नोंदविला आहे.

उमेदवारी अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आणि माहिती लपविल्याचा अर्ज त्यांनी बुधवारी (ता. 27) निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे दिला आहे. या अक्षेपावर चार वाजता सुनावणी होणार आहे.

भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी सोमवारी (ता. 25) लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. मुंडे यांचे मतदान यादीत परळी मतदार संघातील यादी भाग क्रमांक 41 मधील 585 क्रमांकावर नाव आहे. मात्र, मुंबईमधील वरळी मतदार संघाच्या मतदार यादीतही त्यांचे यादी भाग क्रमांक 55 मध्ये 1140 क्रमांकावर नाव असल्याचा दावा करुन त्यांनी यादीची प्रतही सोबत जोडली आहे.

डॉ. मुंडे या मतदारांना भावनिक करण्यासाठी कै. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव स्वत:च्या नावापुढे लावतात. परंतु, त्यांचे आर्थिक व व्यवसायिक व्यवहार प्रितम गौरव खाडे नावाने करतात. त्यांचे पॅन कार्ड क्रमांक (ALGPM9247A) व व्यवसायिक डीन नंबर (02153838) हा देखिल प्रितम गौरव खाडे या नावाने असल्याचा दुसरा अक्षेप नोंदविला आहे. प्रितम गोपीनाथ मुंडे यांनी प्रितम गौरव खाडे नावाने काढलेला डीन (DIN) नंबर त्यांनी 2015, 2016 व 2017 या वर्षांचे आर्थिक हिशोब वेळेत सादर न केल्याने 2022 पर्यंत रद्द केल्याचा दावा तिसऱ्या क्रमांकाच्या अक्षेपात नोंदविला आहे. 
त्यांनी उमेदवारी अर्जात आपल्या स्थावर मालमत्तेची माहिती चुकीची आणि लपविल्याचेही नमूद केले आहे. तसेच, सहाव्या क्रमांकाच्या अक्षेपात त्या संचालक असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या बाबतीत झालेल्या अनियमितता प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे, बँकेवरील याचिका आणि सहकार विभागाकडे चौकशांचे मुद्दे नमूद केले आहेत.

कालिदास अपेट यांनी दाखल केलेल्या आक्षेपांवर चार वाजता निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com