Loksabha 2019: तोडपाणी करणारे मुंडेसाहेबांचे वारस होऊ शकत नाहीत: पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 एप्रिल 2019

- गोपीनाथ मुंडेनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते
- आताचे विरोधी पक्षनेते सेटिंग करतात
- तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत

जिंतूर : गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते, पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात असा आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात, तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत. पंकजा मुंडे यांनी जिंतूर येथील सभेत हा आरोप केला. युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ त्या बोलत होत्या.

अनेक घरात भांडण लावण्याच काम या राष्ट्रवादीने केले आहे, आमचं उदाहरण तर जग जाहीर आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नेत्यांची चमचेगिरी करतात, मुंडे घराण्यात ते घराणेशाही बोलतात पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करत असल्याचेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Web Title: Pankaja Munde slams Dhanjay Munde In jintur