Loksabha 2019 : सहाशे रुपये हप्ता भरुन 50 रुपये विमा मिळणे ही शेतकऱ्यांची चेष्टा : शरद पवार

अनिरुद्ध धर्माधिकारी
सोमवार, 13 मे 2019

शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सढळ हाताने पुढे यावे असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांनी केले.

लोकसभा 2019
आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सढळ हाताने पुढे यावे असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांनी केले.

याचबरोबर जर शेतकऱ्यांनी पिक विम्याचा सहाशे रुपये हप्ता भरुन 50 रुपयेच भरपाई मिळाली असेल तर ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचेही शरद पवार म्हणाले.

श्री. पवार सोमवारी (ता. 13) जिल्ह्यातील दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी रोहित पवारांसह खडकत (ता. आष्टी) येथील चारा छावणीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पाणी टंचाईची समस्या पवारांसमोर मांडली. तीन हजार लोकसंख्येच्या गावाला दोन टँकर असले दुसरा नियमित येत नाही व पाणी अशुद्ध येत आहे. चारा छावण्या व टँकर सुरु करण्यासाठी राजकीय हेवेदावे असल्याचे म्हणणे यावेळी शेतकऱ्यांनी मांडले. फळबागा निंबोणीच्या फळबागा ह्या जळालेले आहेत. त्याचा विमा मिळाला नाही. काही ठिकाणी विमा मिळाला असला तरी सहाशे रुपये हप्ता भरला असेल तर केवळ पाच पन्नास रुपये विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळाल्याचे शेतकरी म्हणाले. यावर ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचे शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार उषा दराडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे, शिवाजी राऊत, सतीश शिंदे,  शेख मेहबूब यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paying an amount of Rs 600 to get insurance of Rs 50 is the farmers ridicule says sharad pawar