Loksabha 2019 : राज ठाकरे यांनी घेतले गुरुद्वाराचे दर्शन

नवनाथ येवले
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

  • नंदीग्राम एक्सप्रेसने नांदेडच्या रेल्वेस्थानकावर आगमन
  • रेल्वे स्थानकावार स्वागत; सेल्फीसाठी चढाओढ
  • राज ठाकरे यांनी घेतले तख्त सचखंड हजुर साहेब गुरुद्वाराचे दर्शन

लोकसभा 2019
नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी शहरातील तख्त सचखंड हजुर साहेब गुरुद्वाराचे दर्शन घेतले.
गुरुद्वारा बोर्डच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले श्री. ठाकरे
यांनी संत बाबा कुलवंतसिंघ यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या समवेत
मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर, जयप्रकाश बावीस्कर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजीत पानशे, राजुदादा पाटील जिल्हाध्यक्ष मोन्टीसींगजहागिरदार आदी पदाधिकारी होते.

मोदी सरकारच्या विरोधात पहिल्या जाहिर सेभेसाठी शुक्रवारी (ता. 12)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सकाळी नंदीग्राम एक्सप्रेसने नांदेडच्या
रेल्वेस्थानकावर आगमन झाले. मनसे पदाधिकाऱ्यांसह तरुणाईने श्री ठाकरे
यांचे स्वागत केले. जिल्ह्याचे तापमान 42 अंशावर असताना तळपत्या उन्हात राज ठाकरे यांनी तख्त सचखंड हजुर साहेब गुरुद्वाराचे दर्शन घेतले.
गुरुद्वारा बोर्ड समितीच्या वतिने श्री. ठाकरे यांचे शिरोपा आणि स्मृती
चिन्ह देवून स्वागत करण्यात आले. गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी दाखल
झालेल्या श्री. ठाकरे यांच्यासमवेत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईंची एक चढा
ओढ सुरु होती. जिल्हाध्यक्ष मोन्टीसींग जहागीरादार, उषा नरवाडे, अब्दुल
शफिक, रवी राठोड, गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड, राज अवतानी, राजू बर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

raj_nanded

raj_nanded


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray took a Darshan in Gurudwara at Nanded