Loksabha 2019: दानवेंना मिळाला सीबीआयचा रिपोर्ट; जाहीर केला विजयाचा आकडा (व्हिडिओ)

Loksabha 2019: दानवेंना मिळाला सीबीआयचा रिपोर्ट; जाहीर केला विजयाचा आकडा (व्हिडिओ)

जालना: निवडणुकीत कोणाचा विजय होणार, कोणाचा पराभव होणार याचे सर्व्हे अनेक संस्था करत असतात. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चक्क सीबीआयच्या रिपोर्टचा दाखला देत आपण 2 लाख 60 लाख मतांनी विजयी होणार असल्याचे एका जाहीर सभेत सांगितले.

जालन्यात 20 एप्रिल रोजी एका सभेत बोलताना दानवे यांनी दावा केली की, मला सीबीआयचा रिपोर्ट मिळाला आहे. या रिपोर्टमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मी सर्वात लोकप्रिय उमेदवार असल्याचे म्हटले आहे. इतक नव्हे तर सिल्लोड सारख्या विधानसभा मतदारसंघात जिथे मला कमी मताधिक्य मिळते. त्या ठिकाणी यंदा 68 टक्के मिळतील तर काँग्रेसला केवळ 28 टक्के मिळतील, असे त्यांनी सांगितले आहे, हा व्हिडिओ काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे.
 

सीबीआयच्या रिपोर्टनुसार सर्वच तालुक्यात मला यंदा अधिक मते मिळणार असून या सर्व आकडेवारीचा विचार केल्यास मी यंदा 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचे दानवे या व्हिडिओत म्हणत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com