Loksabha 2019 : कलाकारांचे "मत' सेलिब्रेशन! 

Loksabha 2019 :  कलाकारांचे "मत' सेलिब्रेशन! 

मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले.

मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे मुंबई आणि परिसरातील चित्रीकरण दोन-तीन तास बंद ठेवण्यात आले होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी जुहू येथे, तर आमीर खान आणि पत्नी किरण राव यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रात मतदान केले. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन, सलमान खान, अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, फरहान अख्तर, ऐश्‍वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित-नेने, रणबीर कपूर, अजय देवगण, इमरान हाश्‍मी, तारा सुतारिया, शाहरूख खान, रणवीर सिंग आदींनी मतदान केले. मराठी कलाकार स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, प्रिया बापट, आदीनाथ कोठारे, ऊर्मिला कानिटकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. 

गायिका उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, त्यांचा मुलगा आणि सून आदींनी ताडदेव येथील मतदान केंद्रात मतदान केले; मात्र ताप असल्याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर मतदान करू शकल्या नाहीत, असे उषा मंगेशकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com