Loksabha 2019 : उत्तर मुंबईत प्रचाराला चढतोय रंग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी उद्या मंगळवारी (ता. 2) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, ऊर्मिला मातोंडकरने झोपडपट्ट्यांमधून प्रचाराला सुरुवात केली आहे. उत्तर मुंबईत दोन्ही प्रमुख उमेदवारांचा प्रचार वेगात सुरू झाल्याने निवडणुकीचे मैदान चांगलेच तापले आहे. 

मुंबई -  उत्तर मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खरा रंग चढला आहे. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी उद्या मंगळवारी (ता. 2) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, ऊर्मिला मातोंडकरने झोपडपट्ट्यांमधून प्रचाराला सुरुवात केली आहे. उत्तर मुंबईत दोन्ही प्रमुख उमेदवारांचा प्रचार वेगात सुरू झाल्याने निवडणुकीचे मैदान चांगलेच तापले आहे. 

गोपाळ शेट्टी हे मुंबईत प्रचाराला सुरुवात करणारे पहिले उमेदवार ठरले होते; तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसला उत्तर मुंबईत उमेदवारही मिळत नव्हता. अखेरीस ऊर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मातोंडकर यांनी झोपडपट्ट्यांमधून प्रचार सुरू केला आहे. त्याचबरोबर गोराई येथील प्रचारफेरीत त्यांनी खास गुजरातीमध्ये मतदारांशी संवाद साधला. मनसेने ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देत पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आज ऊर्मिला यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट देऊन मनसेचे आभार मानले. 

उत्तर मुंबईत निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला आहे. गोपाळ शेट्टी यांच्याप्रमाणेच आता ऊर्मिला मातोंडकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. मात्र, मुंबईतील उर्वरित पाच मतदारसंघांत प्रचाराने अद्याप तितकासा वेग घेतलेला नाही. 

Web Title: BJP Congress candidates campaign start in north Mumbai