North East Mumbai Loksabha 2019 : चारपर्यंत 55.35 टक्के मतदान

North East Mumbai
North East Mumbai

मुंबई : विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्यात येथे लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 55.35 टक्के मतदानाची नोंद झाली.

आज (सोमवार) सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोमय्या यांनी पाटील यांचा पराभव करत येथे विजय मिळविला होता. पण, शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोमय्या यांना उमेदवारी मिळविण्यात अपय़श आले होते. शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने भाजपने महापालिका गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने संजय पाटील यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.

उत्तर पूर्व मुंबईतील मुलुंड : 60.10, विक्रोळी : 59.03, भांडुप पूर्व : 57.00, घाटकोपर पश्चिम : 58.81, घाटकोपर पूर्व : 60.30, मानखुर्द शिवाजीनगर : 44.02 या विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढीलप्रमाणे मतदानाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com