Loksabha 2019 : सेलिब्रिटी, कॉर्पोरेट जग सामान्य मतदार सर्वच रांगेत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

मुंबईत आज सेलिब्रीटी,कॉर्पोरेट जगतातील मतदारांसह सर्व सामान्य मतदारांनी हक्क बजावला.सर्वाधिक मतदान उत्तर मुंबईत झाले असून काही ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले.

मुंबई : मुंबईत आज सेलिब्रीटी, कॉर्पोरेट जगतातील मतदारांसह सर्व सामान्य मतदारांनी हक्क बजावला. सर्वाधिक मतदान उत्तर मुंबईत झाले असून काही ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे. व्हिव्हिपॅट मशिनमुळे एक मत नोंदवाला किमान सात सेकंद लागत असल्याने काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. 

Image may contain: 7 people, people smiling, closeup

मुंबईत आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. गुजराती आणि मुस्लिम बहुल परीसरात मतदानांचा जोर जाणवत आहे. तर, मराठी मतदार असलेल्या भागात मतदानाचा टक्का धिम्म्या गतीने पुढे जात आहे. उत्तर मुंबईत सर्वाधिक 19.48 टक्के तर दक्षिण मुंबईत 15.51 टक्के सर्वात कमी मतदान नोंदविण्यात आले आहे. सकाळी 11 वाजे पर्यंतचे हे मतदान आहे. पवई येथील तिरंदाज व्हिलेट महानगर पालिका शाळेत दोन ईव्हीएम मशिन एक ते दिड तास बंद होत्या.त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर मालाड मध्येही अशीच परिस्थिती होती. कलिना, कुर्ला परीसरातही काही काळ मतदान मशिन बंद होते. 

राज ठाकरे तासभर रांगेत 
मनसेचे अध्यक्ष दादर येथील बालमोहन शाळेत दुपारी 12 वाजल्याच्या सुमारात मतदानासाठी पोहचले. मात्र, दुपारी 1 वाजे पर्यंत त्यांना रांगेतच उभे राहावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity common man all casts vote