Election Results : पालाघरमध्ये राजेंद्र गावित आघाडीवर; जाधवांची रिक्षा टाकली मागे

palghar_gavit
palghar_gavit

मोखाडा : शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित पुन्हा निवडून येत राजयोगी ठरणार असे भाकित वर्तविले गेले होते. सुरवातीला बळीराम जाधवांनी त्यांना धक्का देण्यास सुरवात केली आहे होती मात्र, गावितांनी आता जवळपास 11 हजारांची आघाडी घेतली आहे. पालघरमध्ये गावितांना 1,24,174 मतं तर बळीराम जाधवांना 1,13,327 मतं पडली आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. निकासबाबत एक्‍झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाजाने धुरळा उडला असतानाच आता वैयक्तिक पातळीवर निकालाचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्याच्या चर्चा समाजमाध्यमांतील व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि ट्विटरवर रंगल्या आहेत. पोटनिवडणुकीपासून नंतर झालेल्या राजकीय उलथापालथीत अवघ्या देशात चर्चेत आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित पुन्हा निवडून येत राजयोगी ठरतात, की बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव रिक्षाने गावितांचे पार्सल नंदुरबारला पाठवतात, या बरोबरच कोण गुलाल उधळणार आणि कोण माती खाणार, हीच चर्चा सध्या समाजमाध्यमात रंगली आहे. 

खासदार राजेंद्र गावित नंदुरबार येथून येऊन मिरा-भाईंदरला स्थायिक झाले. व्यवसाय तेथेच; मात्र राजकीय कारकीर्द पालघर जिल्ह्यात निर्माण करून आपले राजकीय बस्तान त्यांनी बसवले आहे. कॉंग्रेस, भाजप आणि आता शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यात त्यांनी राज्यमंत्री, आमदार आणि खासदार पदांपर्यंत मजल मारली आहे. मात्र, याच गावितांचे पार्सल पुन्हा नंदुरबारला पाठवण्याची भाषा ज्या शिवसेनेने केली होती, त्यांचेच ते आता लक्षवेधी उमेदवार आहेत. तर 2009 च्या पहिल्याच स्वतंत्र पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी बाजी मारत बळीराम जाधव या सामान्य कार्यकर्त्याला खासदार बनवले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हितेंद्र ठाकूर वर्चस्व असलेल्या वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा क्षेत्रात गाफील राहिले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांनी वर्चस्व असलेल्या विधानसभांसह डहाणू, विक्रमगड आणि पालघर विधानसभा क्षेत्रात जोर लावून प्रचार केला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. दोन्हीही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. 

गावितांना राजयोग की, जाधवांची रिक्षा सुसाट? 
निवडणूक निकालावरून जिल्ह्यात समाजमाध्यमांतही चर्चा रंगली आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आम्हीच गुलाल उधळणार, अशी ग्वाही देत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांना गवसणी घालून लोकप्रतिनिधी म्हणून जनतेकडून मान्यता मिळविलेले राजेंद्र गावित पुन्हा निवडून येऊन "राजयोगी' ठरतात की, बळीराम जाधव आपल्या रिक्षाने राजेंद्र गावितांचे पार्सल नंदुरबारला पाठवतात? हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. त्याकडे राजकीय पक्षांसह नागरिकांच्याही नजरा लागल्या आहेत. माध्यम आणि समाजमाध्यमातील चर्चांना विसावा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com