South Mumbai Loksabha 2019 : देवरा की सावंत?; सातपर्यंत 50.17 टक्के मतदान

South Mumbai
South Mumbai

मुंबई : काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पाठिंबा दिल्याने चर्चेत आलेल्या या मतदारसंघात देवरा की शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात लढत होत आहे. आज सायंकाळी सातपर्यंत 50.17 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. त्यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचे आव्हान आहे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. दोनवेळा खासदार राहिलेल्या मिलिंद देवरा यांना 2014 मध्ये सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा यांच्यातच लढत होत आहे. 

दक्षिण मुंबईतील मालबार हिल मतदारसंघात सर्वांत जास्त मतदान झाल्याचे दिसत आहे.
दक्षिण मुंबईतील वरळी : 50.00, शिवडी : 51.00, भायखळा : 53.01, मलबार हिल : 54.00, मुंबादेवी : 46.90, कुलाबा : 46.10 या विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढीलप्रमाणे मतदानाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com