‘गणराज्य आघाडी’चा काँग्रेसला पाठिंबा

Congress
Congress

मुंबई - काँग्रेसप्रणीत महाआघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत समझोता होण्याची शक्‍यता नसताना आंबेडकरी चळवळीतील २५९ लहान-मोठ्या संघटनांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनांनी एकत्र येत ‘गणराज्य आघाडी’ स्थापन केली असून, मंगळवारी (ता. ५) पुण्यात तिची अधिकृत घोषणा होणार आहे. 

वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षांसोबत एकत्र येण्यात हेकेखोरपणा करत आहेत. त्यामुळे पुरोगामी विचारांच्या मतांची विभागणी होऊ नये; तसेच मनुवादी विचारांचे सरकार परत येऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे या आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

या आघाडीत दलित चळवळीतील सुषमा अंधारे, सुरेश माने, अमोल मिटकरी, शेख सुभानल्ली, सुनील खोब्रागडे आदींचा समावेश आहे. आम्हाला प्रकाश आंबेडकरांकडून आशा होत्या; मात्र त्यांची भूमिका अटी व शर्तीच्या कात्रीतच अडकली आहे. मनुवादी व घटनाविरोधी सत्तेला झुगारून देण्यासाठी गणराज्य आघाडीने मवाळ भूमिका घेत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे अंधारे यांनी सांगितले. 

माढ्यातून पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांना धडा शिकवू, असे म्हणणारे प्रकाश आंबेडकर विद्यमान पंतप्रधानांच्या कारभाराबाबत मात्र गप्प का? नितीन गडकरी पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तवणाऱ्या आंबेडकरांची नेमकी भूमिका कोणती, हे शहाण्यांना सांगावे लागत नाही.
- सुषमा अंधारे, आंबेडकरी चळवळीतील नेत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com