Loksabha 2019 : जितेंद्र आव्हाडांचे प्रमोशन! आता 'राष्ट्रवादी'चे राष्ट्रीय सरचिटणीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

परखड मतांचे आव्हाड आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी- 
 जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते मानले जातात. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपला प्रखर विरोध करण्यासाठी ही निवड केली असल्याची शक्यता आहे. 

मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा हा निर्णय जाहीर करण्यात आला.  तत्काळ प्रभावाने सरचिटणीस पदाची सुत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. 

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते मानले जातात. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपला प्रखर विरोध करण्यासाठी ही निवड केली असल्याची शक्यता आहे. आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

सरचिटणीस हे पद राष्ट्रवादीचे काँग्रेस मधील महत्वाचे पद मानले जाते. आव्हाड यांनी गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरही चांगलीच आघाडी घेतली आहे. भाजपला कठोर भाषेत प्रतिउत्तर ते वाहीन्यावरील चर्चेतही देत आहे. 

 

Web Title: Jitendra Awhad appointed as General Secretary of NCP