Loksabha 2019: पवार साहेबांना राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील- आव्हाड

रविवार, 7 एप्रिल 2019

- शरद पवार साहेबांना राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील
- जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

- मोदींना घालवून देशाला वाचवायला हवे

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार साहेबांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड पुढे म्हणाले की, आम्हाला देश वाचवायचा आहे आणि भाजपमंत्री विनोद तावडे यांनी त्याची चिंता करू नये.  हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे आणि ते लोकशाहीला घातक आहे. यासाठी मोदींना घालवायला हवे आणि देशाला वाचवायला हवे. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विनोद तावडे यांनी मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत तिहार मधील टांगत्या तलवारी राष्ट्रवादी काँग्रेस घायाळ झाली असल्याचे म्हटले होते. यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडे यांना फैलावर घेतले आहे.

Web Title: Jitendra Awhad Slams vinod Tawde over commnent on Sharad pawar