Bhiwandi Loksabha 2019 : भिवंडीमध्ये सायंकाळी 07 पर्यंत 55.65 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे आव्हान घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कपिल पाटील यांच्यासमोर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांचे आव्हान आहे. भिवंडी मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली

भिवंडी : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे आव्हान घेऊन पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कपिल पाटील यांच्यासमोर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांचे आव्हान आहे. भिवंडी मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली.

राज्यात भाजप-शिवसेना युती असली, तरीही भिवंडी आणि पालघरमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारांच्या निवडीवरून नाराज आहेत. त्यापैकी काही कार्यकर्त्यांनी उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची भाषा केल्याने गेल्या काही आठवड्यांमध्ये दोन्ही उमेदवारांची धावपळ झाली.

शिवसैनिकांच्या नाराजीचा निवडणुकीमध्ये फटका बसू नये, यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कपिल पाटील यांना घेऊन समेट घडविण्याच्या हालचालींमध्ये काही दिवसांपूर्वी व्यग्र होते. वाडा तालुक्यातून पाटील यांना किती मतदान होते, हा औत्सुक्याचा विषय आहे.  

भिवंडीमध्ये सातपर्यंत 52.43 टक्के मतदान झाले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
भिवंडी ग्रामीण : 62.10
शहापूर : 55.00
भिवंडी पश्चिम :49.00
भिवंडी पूर्व : 49.00
कल्याण पश्चिम : 44.00
मुरबाड : 58.00

मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapil Patil faces Suresh Taware in Bhiwandi constituency for Loksabha 2019