Loksabha 2019 : मतदारसंघात सोमय्यांची समाजसेवा अजूनही सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

गोरगरिबांसाठी कानाचे यंत्र देणे, त्याच्या वाटपाची सूचना देणे, ही कामे सोमय्या यांनी नित्यनेमाने सुरू ठेवली असल्याने भाजपचे उमेदवार मनोज कोटक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. सोमय्या हे माझे मोठे भाऊ आहेत, असे कोटक म्हणतात, तर मनोज माझा अनुज आहे, असे किरीट सांगतात.

मुंबई - भाजप- शिवसेना युतीचे ईशान्य मुंबईतले उमेदवार बदलले असले तरी किरीट सोमय्या यांनी तेथे समाजसेवा सुरूच ठेवली आहे. 

गोरगरिबांसाठी कानाचे यंत्र देणे, त्याच्या वाटपाची सूचना देणे, ही कामे सोमय्या यांनी नित्यनेमाने सुरू ठेवली असल्याने भाजपचे उमेदवार मनोज कोटक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. सोमय्या हे माझे मोठे भाऊ आहेत, असे कोटक म्हणतात, तर मनोज माझा अनुज आहे, असे किरीट सांगतात.

परस्परांशी असे उत्तम संबंध असणे चांगलेच, पण सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सोमय्यांची सवय कोटक यांच्या मार्गातला अडसर ठरली आहे. 
कोटक हे नगरसेवक असल्याने संपूर्ण मतदारसंघात फारशे माहीत नाहीत. त्यामुळे प्रचारसभा, भेटीगाठी यावर ते भर देत असले, तरी सतत सोमय्यांचे कार्य त्यांचा सावलीसारखा पाठलाग करत असते.

Web Title: Loksabha Election 2019 kirit somaiya Manoj Kotak Politics