Loksabha 2019 : मराठी मालिकेतही भाजपचा प्रचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. हिंदी मालिकांप्रमाणे मराठी मालिकेमधूनही भाजपचा प्रचार केला जात असल्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. हिंदी मालिकांप्रमाणे मराठी मालिकेमधूनही भाजपचा प्रचार केला जात असल्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
झी मराठी वाहिनीवरील "तुला पाहते रे' या मालिकेच्या सोमवारी (ता. 8) प्रसारित झालेल्या भागात सरकारच्या "मेक इन इंडिया' योजनेचा प्रचार करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आली.

मालिकेतील नायिका ईशाची मैत्रीण रूपाली आणि मित्र बिपीन यांचे दृश्‍य दाखविण्यात आले. सरकारच्या "मेक इन इंडिया' योजनेमुळे लाभ झाल्याचे बिपीन सांगतो; हा संवाद म्हणजे सत्ताधारी भाजपचा प्रचार असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याआधी झी टीव्हीच्या "तुझसे है राबता' आणि "ऍण्ड टीव्ही'च्या "भाभीजी घर पर है' या मालिकांमधून सरकारची कामे आणि योजनांचा प्रचार केल्याची तक्रार कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.

Web Title: Loksabha Election 2019 Marathi Serial BJP Publicity