Loksabha 2019 : नांदेड, सोलापुरात राज यांच्या सभा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या नांदेड येथे पहिली सभा पार पडल्यानंतर सोलापूरला दुसरी सभा होईल. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या नांदेड येथे पहिली सभा पार पडल्यानंतर सोलापूरला दुसरी सभा होईल. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी राज्यभरात प्रचार करणार नसल्याचे त्यांनी पाडव्याच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. यानुसार पहिल्या टप्प्यात राज ठाकरे यांच्या सहा सभा होणार असून, आवश्‍यकतेनुसार सभांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता मनसे नेते व्यक्‍त करीत आहेत.

Web Title: Loksabha Election 2019 Nanded Solapur Raj Thackeray Speech Politics