Loksabha 2019 : मोदींच्या भाषणाचा अहवाल सादर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 एप्रिल 2019

लातूर जिल्ह्यातील औसा येथील भाषणात ‘तुमचे मत बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकते का, पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकते का,’ असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या संदर्भातील अहवाल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.

मुंबई - लातूर जिल्ह्यातील औसा येथील भाषणात ‘तुमचे मत बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकते का, पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकते का,’ असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या संदर्भातील अहवाल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.

बालाकोटमधील हवाई हल्ल्याचा मुद्दा करत मते मागितल्याप्रकरणी मोदी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना अर्पण करावे, असे आवाहन त्यांनी लातूरच्या औसा येथील सभेत मंगळवारी केले होते. यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठल्यावर मोदींच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली.

आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी अहवाल मागितला असता, लिखित स्वरूपात अहवाल दिल्याचे निवडणूक कार्यालयातून सांगण्यात आले. भारतीय लष्कर आणि जवानांच्या नावाने कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने प्रचारातून किंवा निवडणुकीसंदर्भातील कुठल्याही कार्यक्रमातून मते मागू नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने १९ मार्च २०१९ रोजीच दिले असताना पंतप्रधानांनी मतदारांना आवाहन केले.

Web Title: Loksabha Election 2019 Narendra Modi Speech Report Politics