Loksabha 2019 : प्रिया दत्त यांच्यासाठी संजय करणार रोड शो

शनिवार, 20 एप्रिल 2019

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त  मैदानात उतरणार आहे.

मुंबई - उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त  मैदानात उतरणार आहे.

अभिनेता संजय दत्त आता प्रिया यांच्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघात रोड शो करणार आहे. सध्या प्रिया दत्त यांचा प्रचार हा लहान मोठ्या बैठका, द्वार ते द्वार प्रचार अशा पद्धतीने सुरू आहे. आता त्याच्या मदतीला भाऊ संजय दत्त येणार आहे. सोमवारपासून संजय दत्त यांच्या रोड शोला सुरवात करणार आहे. उत्तर मध्य मुंबईत गेल्या वेळी प्रिया दत्त यांना पूनम महाजन यांनी पराभूत केल्यामुळे त्यांच्याकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

सुरवातीला प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र पक्षातील नेते, कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर त्या तयार झाल्या आहेत.