Loksabha 2019 : शिवसेनेने कोकणात दाखवला आयर्लंडमधील महामार्ग 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 एप्रिल 2019

विद्यमान खासदार आणि युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी कोकणातील विकासकामे दाखवताना पोस्टरवर चक्‍क आयर्लंडमधील महामार्ग दाखवल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेला ट्रोल केले.

मुंबई - विद्यमान खासदार आणि युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी कोकणातील विकासकामे दाखवताना पोस्टरवर चक्‍क आयर्लंडमधील महामार्ग दाखवल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेला ट्रोल केले. 

शिवसेना खासदार राऊत यांच्या प्रचारासाठी "प्रगत कोकण, शांत कोकण' या टॅगलाइनसह पोस्टर्स छापण्यात आली आहेत. या पोस्टर्समध्ये राऊत यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महायुतीतील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि रासपच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र या पोस्टर्सवर कोकणचा विकास म्हणून जो रस्ता दाखवण्यात आला आहे ते छायाचित्र कोकणातील रस्त्याचे नसून आयर्लंडमधील असल्याचे उघड झाले आहे. कोकणचा रस्ता म्हणून दाखवण्यात आलेला रस्ता हा आयर्लंडमधील विकलो शहरातील आहे. आयर्लंडच्या पूर्व किनारपट्टीवरील ग्लेन ऑफ डाऊन्स या जगप्रसिद्ध जागेपासून हे ठिकाण जवळच आहे. 

याप्रकरणी नोटकऱ्यांकडून सोशल मीडीयावरून शिवसेनेवर टीकांचा भडिमार सुरू आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Shivsena Konkan Ireland Highway