Loksabha 2019: पार्थ पवार, अमोल कोल्हे आणि समीर भुजबळांना 'राष्ट्रवादी'चे तिकीट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

काल (ता.15) राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे, या यादीत पाच लोकसभा मतदार संघाचा समावेश असणार आहे. यामध्ये मावळमधून पार्थ पवार,  शिरूर मधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ,  बीडमधून बजरंग सोनवणे, तर  दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई- काल (ता.15) राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे, या यादीत पाच लोकसभा मतदार संघाचा समावेश असणार आहे. यामध्ये मावळमधून पार्थ पवार,  शिरूर मधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ,  बीडमधून बजरंग सोनवणे, तर  दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मावळ - पार्थ पवार 
शिरूर - अमोल कोल्हे 
नाशिक - समीर भुजबळ 
बीड - बजरंग सोनावणे
दिंडोरी - धनराज महाले

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत काल राष्ट्रवादीच्या 11 उमेदवारांची घोषणा केली. पक्षाचे विद्यमान खासदार व वरिष्ठ नेत्यांना पुन्हा मैदानात उतरवताना मावळ, माढा व शिरूर येथील उमेदवारांची मात्र घोषणा पहिल्या यादीत केली नव्हती. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला असून, उर्वरित उमेदवारांची यादी उद्या आणि उद्या जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली होती. बीड, अहमदनगरच्या उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच ही नावेही जाहीर केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या पहिल्या यादीत परभणीतून राजेश विटेकर, तर कल्याणमधून बाबाजी पाटील या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती.

Web Title: NCP releases second list of candidates for Loksabha polls