Loksabha 2019: पालघरमध्ये सेनेकडून वानगा यांना डच्चू; भाजपच्या खासदारांना उमेदवारी निश्चित

Loksabha 2019: पालघरमध्ये सेनेकडून वानगा यांना डच्चू; भाजपच्या खासदारांना उमेदवारी निश्चित

मुंबई: पालघरमध्ये शिवसेनेकडून श्रीनिवास वानगा यांना डच्चू दिला असून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.यावेळी गावित हे कमळावर नव्हे तर शिवसेनेच्या धनुष्यबानावर लढणार आहेत. म्हणजेच ते युतीचे असले तरी शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. 

वास्तविक पालघरची लोकसभेची जागा ही भाजपच्या वाटेला राहिलेले आहे. दिवंगत खासदार चिंतामन वनगा हे भाजपचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर मात्र येथील गणितच बदलले.वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर गावित यांना कॉंग्रेसमधून भाजपत आणण्यात आले होते. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती आणि गावित निवडून आले होते. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती झाल्याने गावितांची गोची झाली होती. श्रीनिवास यांना शिवसेनेचे तिकीट मिळणार असेही बोलले जात होते. मात्र गेल्या दोन दिवसात नाट्यमय घडामोडी असून श्रीनिवास यांचे नाव मागे पडले आहे. येथे गावितांनीच लढावे असे युतीमध्ये ठरल्याचे समजते. मात्र, गावित हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. विशेष म्हणजे ते कमळाऐवजी धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहेत. म्हणजेच गावित यांचा प्रवास कॉंग्रेसचे आमदार, मंत्री, भाजपचे खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार असा राहणार आहे.

तसेच, यानंतर वनगा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत या बदल्यात त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com