Loksabha 2019 : कॉंग्रेसचा देशावर 60 वर्षे दरोडा - उद्धव ठाकरे 

सोमवार, 22 एप्रिल 2019

कॉंग्रेसने 60 वर्षे देशावर दरोडा घातला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

मुंबई - कॉंग्रेसने 60 वर्षे देशावर दरोडा घातला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

कॉंग्रेसने केलेला भ्रष्टाचार जनता कधीच विसरू शकत नाही. या काळ्या कारभाराचे परिणाम जनता अजून भोगत आहे, असा हल्ला ठाकरे यांनी चढवला. वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. धारावी प्रकल्प प्रत्यक्षात उतरवू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्‍न सोडवले; म्हणून युती केली. आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला आहे. विरोधकांकडे एकही उमेदवार नाही, असे ते म्हणाले. युती झाल्यामुळे आघाडीची अडचण झाली, असा टोलाही त्यांनी लगावला.