लोकसभा 2019: विखे घराण्याचा बंडखोरीचा इतिहास नवा नाही...!

लोकसभा 2019: विखे घराण्याचा बंडखोरीचा इतिहास नवा नाही...!

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. हा प्रवेश केल्यानंतर मात्र विखे घराण्याला बंडखोरीचा इतिहास नवा नाही हेच लक्षात येते.

काय आहे विखे घराण्याचा बंडखोरीचा इतिहास

1978 मध्ये विखे यांनी काँग्रेसच्या विरोधात महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस (मसका) काढली.

1989 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात व्हि.पी.सिंग यांना पुढे करत व काही खासदारांना बरोबर घेत राजीव गांधी विरोधी फोरम तयार केला.
 
1995 राज्यात सेना-भाजपा सत्ता आल्यानंतर सत्तेसाठी याच विखे परिवाराने शिवसेना पक्षात प्रवेश केला.

1990 ते 2019 पर्यंत यांची काँग्रेस पक्षविरहित जिल्हा विकास आघाडी अहमदनगर जिल्ह्यात कायम कार्यरत ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष विरोधी निवडणूका केल्या.

2007 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदी सव्वा वर्ष सत्यजीत तांबे व सव्वा वर्ष शालिनी विखे यांची निवड ठरली असताना राजीनामा न देता पक्षादेश झुगारला.

2009 च्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप सेनेला बरोबर घेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजीत तांबे यांचा पुन्हा पराभव केला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवानंतर बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसने भाजपाला सरकार सथापनेसाठी पाठिंबा द्यावा, असे विचित्र आवाहन केले व भाजप प्रवेश करण्याचा दबाव टाकून मुलगा राधाकृष्ण विखे यांना विरोधी पक्ष नेते पद मिळवले.

राधाकृष्ण व मुख्यमंत्र्याचे कायम हितसंबंध चांगले राहिले व मुख्यमंत्र्यांकडून "कामे" करुन घेतली.

राधाकृष्ण विखे यांनी पाच वर्षांत कधीही भाजपावर टिका केली नाही किंबहुना वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत मैत्री जाहीर केली.

मला भाजप हा पक्ष घरच्यासारखा वाटतो असे सांगून कायम संभ्रमावस्था निर्माण केली. आता ह्याच विखेंनी काँग्रेसचे तिकिट न मिळाल्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com