Adv Prakash Ambedkar filed application for loksabha election from Solapur on Monday
Adv Prakash Ambedkar filed application for loksabha election from Solapur on Monday

Loksabha 2019 : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सोमवारी भरणार सोलापुरात उमेदवारी अर्ज

लोकसभा 2019
सोलापूर : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरातून लाेकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. आंबेडकर कुठून निवडणूक लढणार याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता हाेती. अखेर त्यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि विजयाची खात्री वाटल्याने साेलापूर लाेकसभा मतदारसंघ निवडला. उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान त्याचवेळी साेलापूरमध्ये काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे उमेदवारही अर्ज दाखल करणार आहेत. आता सोलापुरात त्यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

भीमा काेरेगाव येथे दलितांवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी कणखर भूमिका घेतली हाेती. त्यामुळे आंबेडकरी समाज त्यांच्या मागे उभा राहिला. आंबेडकरांनी त्यानंतर वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. त्यात एमआयएमलाही सामावून घेण्यात आले. आंबेडकरांनी राज्यभर विविध सभा घेतल्या. त्यांच्या सभांना माेठा प्रतिसाद मिळाला. आंबेडकरांनी काॅंग्रेससाेबत जाण्याची तयारी दर्शवली हाेती. परंतु जागा वाटपावरुन दाेन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्याने आणि आघाडीत जाण्याला 'एमआयएम' चा विरोध असल्याने आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्वच जागांवर आपले उमेदवारी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com