Loksabha 2019: म्हणून अजित पवार आणि राज ठाकरे नगरमध्ये प्रचाराला आले नाहीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तिसऱ्या टप्प्यात 23 तारखेला मतदान
- अजित पवार आणि राज ठाकरे नगरमध्ये प्रचाराला आले नाहीत याची जोरदार चर्चा 

नगर: लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचेही तिसऱ्या टप्प्यात 23 तारखेला मतदान आहे. पण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे नगरमध्ये प्रचाराला आले नाहीत याचीच चर्चा सध्या आहे.

नगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे अजित पवार नाराज होते त्यामुळेच त्यांनी नगरला सभा न घेतल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा न झाल्यानं संग्राम जगताप यांना तोफगोळा कमी पडला आहे, असल्याचेही सध्या बोलले जात आहे.

दुसरीकडे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या विरोधात प्रचार केला पण, त्यांच्या सभेसाठी नगर दक्षिणचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे आग्रही असातानादेखिल राज यांनी सभा घेतली नाही याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. बाळा नांदगावकर यांनी उमेदवाराच्या प्रतिमेचं कारण देत ही सभा नाकारल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या ताफ्यावर नगरमध्ये झालेली दगडफेकही याला कारणीभूत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar and Raj Thackeray not campaigning in nagar