Loksabha 2019 : डाॅ. विखेंशी राजकीय झुंज देणार राष्ट्रवादीकडून अरुण जगताप

Arun Jagtap from NCP will fight for loksabha election against Dr sujay vikhe patil in nagar
Arun Jagtap from NCP will fight for loksabha election against Dr sujay vikhe patil in nagar

लोकसभा 2019
नगर : डाॅ. सुजय विखे पाटील यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना तोडीस तोड देणारा उमेदवार देण्यासाठी जोरदार चक्रे फिरविली आहेत. विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी दिल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डाॅ. विखे विरुद्ध आमदार अरुण जगताप अशी दुरंगी लढत निश्चित झाली आहे.

मुंबई येथील सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बैठकित जगताप यांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे राज्याचे लक्ष या निवडीकडे लागणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची आघाडीची राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली जागा कोणत्याही परिस्थितीत काॅंग्रेसला न देण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते ठाम होते. जगताप यांचे नाव यापूर्वीही अप्रत्यक्षरित्या जाहीर झाले होते. मात्र त्याची अधिकृत घोषणा विखे यांच्या डावावर अवलंबून राहणार होती. काल डाॅ. विखे यांची भाजपकडून उमेदवारीची घोषणा जाहीर होताच शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा तगडा उमेदवार देण्याची तयारी करीत दोन नावांची चर्चा झाली.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख व आमदार अरुण जगताप ही दोन नावे निश्चित झाली होती. त्यापैकी गडाख यांनी उमेदवारी करण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, जगताप यांनी यापूर्वीच लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे आलेली संधी स्विकारत जगताप यांनी कालच मुंबई काठली. रात्री उशिरापर्य़ंत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होऊन जगताप यांची उमेदवारी निश्चित झाली. त्याची अधिकृत घोषणा मुंबईत आज करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com