Election Results : माणुसकीमुळेच माेदी लाटेतही उदयनराजेंंवर जनतेचे प्रेम ः दमयंतीराजे

गुरुवार, 23 मे 2019

सातारा - सातारा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले हे 1 लाख 25 हजार 078 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 46 हजार 692 मते मिळाली आहेत. आत्तापर्यंत 11 लाख 1 हजार 403 मतांची माेजणी झाली आहे. त्यापैकी उदयनराजेंना 5 लाख 71 हजार 770 मते मिळाली आहेत. 

दरम्यान नक्षत्र संस्थेच्या अध्यक्षा आणि उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजे म्हणाल्या उदयनराजे नेहमीच सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहिले आणि या पूढे ही राहतील. भारतीय जनता पक्षाच्या माेठ्या लाटेत ही ते सातारा मतदारसंघात यशस्वी ठरले आहेत, याचे प्रमुख कारण म्हणजे ते जपत असलेला माणुसकीचा धर्म आणि अखेरच्या श्वासापर्यंत सातारकरांच्या सेवेत राहण्याची वृत्ती. सर्वांचे प्रेम आणि सहकार्यामुळेच यश लाभल्याचे साै. भाेसले यांनी नमूद केले.