भाजपच्या मंत्र्यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या घरी स्नेहभोजन; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा 

BJP ministers eat lunch at home of Shiv Sena district chief Discuss about the assembly elections
BJP ministers eat lunch at home of Shiv Sena district chief Discuss about the assembly elections

लोकसभा 2019
सोलापूर : सलगर वस्ती परिसरात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचा शब्द भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी झालेल्या स्नेहभोजनावेळी आयटी पार्कसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी शुक्रवारी रात्री स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. शहर मध्य मतदारसंघासह सोलापूर दक्षिण आणि शहर उत्तर मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याविषयी विचारमंथन झाले. 

कोठे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना यापूर्वीच घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्नीसह कोठे यांच्या घरी जाऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कोठे यांच्या निमंत्रणाला मान देऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. शहरातील तीनही उमेदवार निवडून आले पाहिजेत, असे पाटील यांनी कोठे यांना सांगितले आहे. मध्य मतदारसंघातून कोठे यांना निवडणून आणण्यासाठी यावेळी सकारात्मक चर्चा झाली. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन्ही मंत्र्यांना आमच्या घरी जेवणाला बोलाविले होते. आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळवून देतो, असे महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सलगर वस्ती परिसरात आयटी पार्कचे भूमिपूजन करायचे आहे. विधानसभेच्या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली. 
- महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com