Election Results : पश्चिम महाराष्ट्रात युतीचा शिरकाव; राष्ट्रवादीला दणका

Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP

मुंबई : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा तब्बल 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुरवातीच्या आघाडीनुसार भाजपला 23 आणि शिवसेनेला 19 जागांवर आघाडी आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 12 जागा असून यापैकी भाजपला 4, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर आघाडी आहे. अशा एकूण नऊ जागांवर युती आघाडीवर आहे. राष्ट्रवादीची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मागील चारही जागा कायम राखण्यात यश मिळणार नाही असे चित्र आहे. 

साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत. माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे आघाडी घेतली आहे. तर, कोल्हापूर, हातकणंगले, शिरूर, सांगली, सोलापूर, पुणे याठिकाणी युतीला यश मिळत आहे. तर, सातारा, माढा, बारामती आणि शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादी आघाडीवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com