Loksabha 2019 : काँग्रेस आपल्याला मुर्ख बनवत होती - चंद्रकांत पाटील 

Congress was fooling us says Chandrakant Patil
Congress was fooling us says Chandrakant Patil

लोकसभा 2019
सोलापूर : अनेक वर्ष काँग्रेस मुर्ख बनवत होती आपल्याला, असा घणाघात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर केला. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघात रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळा येथे भाजप शिवसेना युतीचा समन्वय मेळावा झाला. यामध्ये भाजप सरकारने मराठा व धनगर समाजाचे आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसह इतर केलेल्या कामाचा पाढा वाचून त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीवर टीका केली. 

माढा लोकसभा मतदार संघाची निवडणूक भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. पाटील म्हणाले, मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षण हे प्रश्‍न जिव्हाळ्याचे आहेत. भाजपने घटनेच्या कलमाप्रमाणे मागास आयोगाची स्थापना करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले. काँग्रेस दोन ओळीचे निवेदन केंद्राला पाठवायचे, त्याला काहीही अधार नसल्याने केंद्रामध्ये ते फेकून दिले जाईचे. पुढे बोलताना ते म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप सरकारने धनगड आणि धनगर एकच असल्याचे शपथपत्र दिले आहे. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल परंतु त्यांना सुविधा मिळतील. देश सुरक्षित राहण्यासाठी व देशात नवनवीन कायदे आणण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजयी करण्याचे आवाहन करत संजय मामा निवडून येऊन एकटे काय करणार? असा टोला पाटील यांनी लगावला. देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदींच्या मागे केंद्रात 400 जणांचे हात उभे राहिले पाहिजेत, असे सांगत संजय शिंदेंच्या विरोधात एकजुट निर्माण करा, असे ते म्हणाले. 

तुम्ही का मुर्ख बनता... 
माढ्यातून अजून विरोधकांनी अर्ज भरलेला नाही. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन अर्ज भरू नये. शरद पवार हुशार निघाले, तुम्ही का मुर्ख बनता, अर्ज भरला असेल तर मागे घ्यावा असा माझा सल्ला असल्याचे पाटील म्हणाले. मोदी अजून रणांगणात उतरायचे आहेत. ते जसे बाहेर पडतील तसं काय होत ते आपण 2014 ला पाहिले आहे. माढ्यातही त्यांची सभा आपण घेत असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com