Loksabha 2019 : हातकणंगले मतदारसंघात अनुभवी विरुद्ध नवखा उमेदवार रिंगणात

Loksabha 2019 : हातकणंगले मतदारसंघात अनुभवी विरुद्ध नवखा उमेदवार रिंगणात

खासदार राजू शेट्टींच्या जमेच्या बाजू

  •  आजही रस्त्यावरची लढाई करण्याची क्षमता
  •  ऊस उत्पादकांसाठी अजूनही आश्वासक चेहरा
  •  दूध दर आंदोलनात सरकारची केलेली कोंडी
  •  भाजपविरोधाने केंद्रीय राजकारणात वेधले लक्ष
  •  काँग्रेस-राष्ट्रवादीशी वाढलेली सलगी

खासदार राजू शेट्टींच्या कमकुवत बाजू

  •  विरोधकांच्या गळ्यात गळे घालण्याचा फटका
  •  जातीयवादाचा होत असलेला आरोप
  •  साखर कारखानदारांकडून कोंडी होण्याची भीती

धैर्यशील माने यांच्या जमेच्या बाजू

  •  युवकांना भुरळ घालणारे नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व
  •  माजी खासदार बाळासाहेब माने, निवेदिता माने यांचा प्रबळ वारसा
  •  मतदारसंघात युतीचे सहापैकी पाच आमदार
  •  स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामाचा अनुभव
  •  मतदारसंघात माहोल तयार करण्याची ताकद

धैर्यशील माने यांच्या कमकुवत बाजू बाजू

  •  सर्व भिस्त युतीच्या आमदारांवर
  •  स्वतंत्र माने गटाच्या ताकदीची विभागणी 
  •  मतदारसंघात संपर्क वाढविण्याची गरज 

मतदारसंघातील आमदार

  •  शिरोळ - आमदार उल्हास पाटील (शिवसेना)
  •  हातकणंगले - आमदार डॉ. सुजित मिणचेकर (शिवसेना)
  •  शाहूवाडी- आमदार सत्यजित पाटील (शिवसेना)
  •  इचलकरंजी - आमदार सुरेश हाळवणकर (भाजप)
  •  शिराळा - आमदार शिवाजीराव नाईक (भाजप)
  •  वाळवा - आमदार जयंत पाटील (राष्ट्रवादी)

स्वाभिमानीची भूमिका गुलदस्त्यातच

मैदानाची वेळ जाहीर झाली; मात्र लढत कोणाच्या पाठिंब्यावर होणार याबाबतचे चित्र अद्यापही हातकणंगले लोकसभा मतदार संघात अस्पष्ट आहे. खासदार राजू शेट्टी हे कोणाचे बळ घेऊन लढणार की दोन्ही बलाढ्य युतींच्या विरोधात स्वतंत्रपणे आपले अस्तित्व दाखवणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अपेक्षित जागाच न मिळाल्यामुळे स्वाभिमानी संघटनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात राहिली आहे.

लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघांतील पालटलेले चित्र आणि नव्या समीकरणात कोण कोणाला किती छुपा पाठिंबा देऊन आपली राजकीय खेळी खेळणार, यावरच उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. 
औद्योगिक परिसर, ऊसशेतीचा परिसर आणि डोंगराळ पट्टा असा संमिश्र भाग असलेल्या हातकणंगले मतदारसंघाची विभागणी वेगवेगळ्या घटकांतील मतदारांत झाली आहे; तरीही गेल्या दोन्ही निवडणुकांत सामान्यांचा कैवारी म्हणून श्री. शेट्टी यांनी जनमनात तयार केलेले स्थान त्यांना महत्त्वपूर्ण ठरले. त्यातच गेल्या निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावाचा फायदा त्यांना विशेषत: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात झाला.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात त्यांनी घेतलेली आघाडी लक्षवेधी ठरली होती; मात्र यावेळच्या निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य घट लक्षात ठेवून त्यांना काम करावे लागणार आहे. माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी शिवसेनेचा बाण हातात घेऊन लढाई जाहीर केली आहे. शिवसेनेची उमेदवारी सदाभाऊ खोत की धैर्यशील माने याबाबत अनेकवेळा तर्कवितर्क लढविले जात असले; तरी शिवसेनेकडून धैर्यशील यांच्या उमेदवारीला प्राधान्य दिले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळचे चित्र वेगळेच आहे.

श्री. शेट्टी यांच्या बाजूने त्यावेळी भाजप, शिवसेना यांसह अन्य गटही होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठबळावर निवडणूक लढविणार की नाही, याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. जर तरच्या गुणाकारात आणि यावेळच्या जातीय राजकारणाच्या प्रवाहात लढत लक्षवेधी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com