Loksabha 2019 : 'रिपांईची स्वबळावरही लढण्याची तयारी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

सोलापूर - मागील निवडणुकीपासून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे भाजप-शिवसेना युतीसोबत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, हे अद्यापही पक्ष पातळीवरून सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे भाजपने आठवले यांची जागेची मागणी अद्याप मान्य केलेली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे रिपाइंचे शहराध्यक्ष सुधीर बिडबाग यांनी सांगितले.

रिपाइंच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्षासमवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पक्षाचे काम केले जाईल, असेही बिडबाग यांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत रिपाइंने युतीचे काम प्रामाणिपणे करूनही आगामी निवडणुकीत भाजपकडून रिपाइंला डावलले जात आहे. दरम्यान, जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे. स्वबळाच्या दृष्टीने शहरातील सर्व वॉर्ड शाखा अध्यक्षांच्या बैठका घेतल्या जात आहेत. शहरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात असल्याचे बिडबाग यांनी सांगितले. विविध समाजातील नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपकडून आमच्या पक्षाला आवश्‍यक तेवढ्या जागा मिळतील, अशी आशा आहे. 

जागा वाटपात पक्षाला डावलल्यास पक्षाच्या आदेशानुसार योग्य ती दिशा ठरविली जाईल, असे त्यांनी सांगितले. काही कारणास्तव राजाभाऊ सरवदे यांच्या विरोधात रिपाइंत दोन गट पडले असले तरी समाजहितासाठी रिपाइंचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संघटित काम करतील, असे बिडबाग म्हणाले.

दरम्यान, रिपाइंच्या जागावाटपाचा तिढा भाजपने सोडविल्यास आठवले यांच्या आदेशानुसार भाजप-शिवसेना युतीचे काम केले जाईल. तिढा न सुटल्यास पक्षाची स्वबळाचीही तयारी असेल, असे त्यांनी स्पष्‍ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 : The Republican Party is ready to fight on its own says sudhir bidbag