esakal | Loksabha 2019 : सांगलीत तरुण, नवमतदारांच्या उत्साहाने चुरशीने मतदान 
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : सांगलीत तरुण, नवमतदारांच्या उत्साहाने चुरशीने मतदान 

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार मताची टक्केवारी गतवेळची 63 टक्केवारी ओलांडण्याची शक्‍यता असून सुमारे 65 टक्केपेक्षा अधिक मतदान होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Loksabha 2019 : सांगलीत तरुण, नवमतदारांच्या उत्साहाने चुरशीने मतदान 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार मताची टक्केवारी गतवेळची 63 टक्केवारी ओलांडण्याची शक्‍यता असून सुमारे 65 टक्केपेक्षा अधिक मतदान होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तरुण, नवमतदार, महिला आणि ज्येष्ठांचाही आज मतदानात उत्साह जाणवत होता. मतदान केंद्रावर रांगा, मतदारांना खेचण्यासाठी कार्यकर्त्यांतील चढाओढमुळे चुरस जाणवली. जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडण्याच्या प्रकारांमुळे मतदारात नाराजी दिसली. यादीत नावे नसल्याने अनेकांना मतदान न करता घरी परतावे लागले. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 60 टक्के मतदान झाले. निवडणूक रिंगणात बारा उमेदवार असतील तर तिरंगी लढतीमुळे मतदानाची टक्का वाढणार आहे. सन 2014 मध्ये 63.28 टक्के मतदान झाले होते. 

सकाळी सात वाजता मतदान सुरु झाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. काही केंद्रांवर कर्मचारी मतदारांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र होते. नऊपर्यंत सुमारे सात टक्के एवढेच मतदान झाले. नऊनंतर मात्र मतदारांची वर्दळ वाढली. मतदारांना आणण्यांसाठी वाहनांचा सर्रास वापर करण्यात आला. कार्यकर्त्यांत मतदार आपल्या बाजून खेचण्यासाठी चढाओढ दिसली. नवमतदार व तरुणाईचा मोठा उत्साह दिसून आला. सकाळी नऊपासूनच रांगा लागल्या होत्या. महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदारांनी केंद्राच्या शोधासाठी सरकारच्या 1950 क्रमांकावर मोठ्या प्रमाणावर चौकशी झाली. 
 
सायंकाळी पाचपर्यंतचे विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी, मिरज- 58.73, सांगली 58.82, पलूस 62.1, खानापूर 59.39, तासगाव- कवठेमहांकाळ 61, जत- 56.88, एकुण -59.43 

"वडा-पाव'चा आधार 

मतदान केंद्राबाहेर मतदार यादी पाहण्यासाठी आणि स्लीप तयार करण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी टेबल लावले होते. सकाळी सातपासून उमेदवारांचे प्रतिनिधी मतदात्यांच्या सोईसाठी याद्या घेऊन बसले होते. त्यांच्या सोईसाठी "वडा-पाव' ची सोय केली होती. त्यामुळे "वडा-पाव' वर ताव मारत कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका चोख बजावली. 

हजारो लिटर मठ्ठा गट्टम 
उन्हाचे चटके बसत असताना कार्यकर्ते आणि मतदारांनी मठ्ठा गट्टम करत थंडावा शोधला. दिवसभरात हजारो लिटर मठ्ठा खपला. काही लाख रुपयांची उलाढाल झाली. जागोजागी स्टॉल लावण्यात आले होते. सोबत लिंबू सरबत आणि रसवंतीगृहांची उलाढालही प्रचंड वाढली. 
मतदान केंद्रावर रांगा होत्या, उन्हात घाम निघत होता. लोक कंटाळले होते. जाताना दहा रुपयांचा ग्लास मठ्ठा ताजातवाना करत होता. कार्यकर्ते दिवसभर त्यावर ताव मारताना दिसत होते. मतदान केंद्राच्या सर्व रस्त्यांवर स्टॉल लावले गेले होते. 

स्काऊट-गाईडची मुले आली कामी 
मतदान केंद्रावर शांतता राखताना पोलिसांची दगदग सुरु होती. वाहनांचे पार्किंग, रांगेत उभे करणे, मोबाईल बंद ठेवण्याच्या सूचना देणे, पोलिंग एजेंटना आवरणे असा व्याप होता. अशावेळी माध्यमिक शाळांत शिकणारी स्काईट-गाईडची मुले त्यांच्या मदतीला आली. गणवेशात आलेल्या या आपल्याच गावातील मुलांचा रुबाब पाहून गावकऱ्यांनाही भारी वाटले. ही मुले अजून मतदार नाही, मात्र त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला. 

loading image