Loksabha 2019 : शिवसेनेला हवाय सहकारमंत्र्यांचा मतदारसंघ

तात्या लांडगे  
शुक्रवार, 15 मार्च 2019

शिवसेनेला हवाय सहकारमंत्र्यांचा मतदारसंघ 
दक्षिण सोलापूर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा असून मागील निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप व शिवसेना यांच्या तिरंगी लढतीत भाजपचे उमेदवार तथा विद्यमान सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तेथे विजय मिळविला. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमधून भाजपत गेलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांना बार्शीतून उमेदवारी हवी आहे. मात्र, काही झाले तरी हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावेत अन्यथा युती झाली तरीही संबंधित उमेदवाराला मदत केली जाणार नसल्याची भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. 

सोलापूर -  उन्हाच्या कडाक्‍याप्रमाणे आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कडका वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोणत्याही पक्षाने लोकसभेच्या सर्व उमेदवारांची नावे अद्यापही जाहीर केली नाहीत. आयारामांना आणि नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जात असल्याने भाजप-शिवसेनेसह अन्य पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता विधानसभेची चिंता सतावत आहे. 

मागील निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या शिवसेना-भाजपला विधानसभा तिकीट वाटप अडचणीचे ठरणार असल्याचे चित्र आतपासूनच पहायला मिळत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे अनेक मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेले आहेत. दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे वारंवार स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात लाखो रुपयांचा खर्चही केला. परंतु, उमेदवारी देताना आयारामांना प्राधान्य दिले जात आहे. आता लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली असली तरी विधानसभेच्या जागावाटपात नशिबी निराशाच येईल म्हणून भाजप-शिवसेनेतून अनेक आजी-माजी पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ही शक्‍यता ओळूखन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने काही महिन्यांपूर्वी विधानसभा जागा वाटपाचा तिढा सोडविल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेला हवाय सहकारमंत्र्यांचा मतदारसंघ 
दक्षिण सोलापूर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा असून मागील निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप व शिवसेना यांच्या तिरंगी लढतीत भाजपचे उमेदवार तथा विद्यमान सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तेथे विजय मिळविला. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमधून भाजपत गेलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांना बार्शीतून उमेदवारी हवी आहे. मात्र, काही झाले तरी हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावेत अन्यथा युती झाली तरीही संबंधित उमेदवाराला मदत केली जाणार नसल्याची भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. 

खर्च अन्‌ विजयाची चिंता नको  तुम्ही फक्‍त आमच्या पक्षात या 
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या अथवा उमेदवारीची खात्री नसलेल्यांचे भाजपत इनकमिंग सुरू आहे. जेथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे, अशा ठिकाणच्या स्ट्रॉंग उमेदवाराला पैशाची ऑफर दिली जात असून विजयाची खात्री देऊन त्यांच्या निवडणुकीचा खर्चही करण्याची जबाबदारी भाजपने उचलल्याची चर्चा आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नशिबी पुन्हा सतरंज्या आणि खुर्च्या उचलणेच येत असल्याचे चित्र पाहण्यात येत आहे. 

Web Title: Loksabha 2019 shivsena want South Solapur Assembly Constituency