Loksabha 2019 : विशाल पाटील का पळ काढत आहेत ? 

 Loksabha 2019 : विशाल पाटील का पळ काढत आहेत ? 

सांगली - चाळीस वर्षे ज्यांच्या घरात खासदारकी आहे ते विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यापासून पळ का काढत आहेत, असा घणाघात आमदार विश्‍वजीत कदम यांनी आज घातला.

सांगलीची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर आज काँग्रेस पक्षात हल्लकल्लोळ माजल्यानंतर श्री. कदम यांनी आज "अस्मिता' बंगल्यावर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यावेळी काँग्रेस पक्षच इथून लढेल मात्र पक्ष जो अंतिम निर्णय घेईल त्याला सोबत असेल 

ते म्हणाले,"" मी लोकसभा लढणार नाही, असे पहिल्यांदाच सांगताना काँग्रेस जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तथापि हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पुण्यातील बैठकीत खुद्द विशाल पाटील यांनीच प्रतीक पाटील यांचा मतदारसंघात संपर्क नाही असे सांगून ते निवडणूक लढवण्यास सक्षम नाहीत असे जाहीर केले. त्यावेळीही आम्ही कोणतीही भूमिका न घेता पक्षाच्या निर्णयासोबत राहू अशी स्पष्ट ग्वाही दिली होती. आज मात्र तेच विशाल पाटील स्वाभीमानीला उमेदवारी बहाल केल्याबद्दल इतरांवर खापर फोडत आहेत. त्यांच्या हिंमत असेल तर तेच पुढे येऊन मी लढतोय असे का सांगत नाहीत? '' 

ते म्हणाले,"" काँग्रेसने ही जागा लढवलीच पाहिजे अशी ठाम भूमिका मी घेतली आहे. त्यासाठी तीन दिवसापुर्वी मी खासदार राजू शेट्टी यांची जयसिंगपूरला भेट घेतली होती. त्यात तुम्ही सांगलीची जागा मागू नका, अशी विनंती केली होती. सांगलीत  काँग्रेस लढावी यासाठी आम्ही ठोस कृती केली. विशाल पाटील यांनी काय केले हे सांगावे. आम्ही शेवटपर्यंत पक्षाकडे आग्रही भुमिका घेऊ मात्र शेवटी पक्ष निर्णय घेईल त्यांच्यासोबत आम्ही राहू.'' 

ते म्हणाले,"" काँग्रेस पक्षात विशाल, प्रतिक आणि पृथ्वीराज पाटील यापैकी कोणीही उमेदवार पक्षाने दिला तर आम्ही ताकदीने त्याच्यासोबत असू. याउलट विशाल यांची भुमिका मात्र काँग्रेसने आमच्यातच उमेदवारी दिली पाहिजे अशी भुमिका आहे. ते मला उमेदवारी घ्यावी यासाठीचे त्यांच्या औंदार्याचा अनुभव आम्ही मोहनदादांच्यावेळी घेतला आहे. मात्र कदम कुटुंबियानी त्यांना माफ केले आहे. त्यांनी जरुर लढावे आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहू. '' 

विश्‍वजीत म्हणाले, 

  • जिल्ह्यातील दिग्गज नेते नाहीत त्यामुळे सध्या काँग्रेससाठी कठीण कालखंड. 
  • सांगलीचा निर्णय अद्याप झालेला नाही; काँग्रेसचे जहाज कदापि बुडून देणार नाही. 
  • विशाल पाटील यांनी केवळ स्टटंबाजी केली, तेच लढायलाच तयार नाहीत. 
  • आघाडीचे नेते म्हणून जयंत पाटील यांनी त्यांची भुमिका मला सांगितली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com