Loksabha 2019 : माढा लोकसभेसाठी 31 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

माढा लोकसभा मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी सहा जणांनी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात 31 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, तरीही राष्ट्रवादीचे संजय शिंदे व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच मुख्य लढत होईल.

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी सहा जणांनी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात 31 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, तरीही राष्ट्रवादीचे संजय शिंदे व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातच मुख्य लढत होईल.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत पाच अर्ज बाद झाले. शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल. त्यात भाजपचे फलटणचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम, बशीर शेख, विठ्ठल ठावरे, अशोक वाघमोडे, रामचंद्र गायकवाड, प्रभाकर ऊर्फ दिनकर देशमुख यांचा समावेश आहे.

या मतदारसंघात तीन राष्ट्रीय, आठ प्रादेशिक पक्षाचे, तर 20 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. एकाच चिन्हासाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केल्याने चिठ्ठीने चिन्हांचे वाटप करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीला सोलापूर मतदारसंघात कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. मात्र, माढा मतदारसंघातील "वंचित' उमेदवार विजयराव मोरे यांना चावी हे चिन्ह मिळाले आहे.

माढा लोकसभेसाठीचे उमेदवार
अप्पा लोकरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संजय शिंदे, नवनाथ पाटील, नानासाहेब यादव, ब्रह्मकुमारी प्रमिलाबेन, मारुती केसकर, रामचंद्र घुटकुडे, विजयराव मोरे, शहाजहान शेख, सुनील जाधव, आजिनाथ केवटे, अजिंक्‍य साळुंके, अण्णासाहेब मस्के, सिद्धेश्‍वर आवारे, दत्तात्रय खटके, दिलीप जाधव, दौलत शितोळे, नंदू मोरे, मोहन राऊत, रामदास माने, विजयानंद शिंदे, विश्‍वंभर काशीद, सचिन जोरे, सचिन पडळकर, सविता ऐवळे, संतोष बिचकुले, संदीप खरात, संदीप पोळ.

Web Title: Loksabha Election 2019 Madha Constituency Candidate Politics