Loksabha 2019 : माढ्याचा तिढा अन्‌ शरद पवारांनाच वेढा

व्यंकटेश देशपांडे
शनिवार, 16 मार्च 2019

फलटण - लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीकडून माढ्याचा तिढा सुटलेला नसल्याने आता पुन्हा एकदा इच्छुकांचा वेढा पडेल की काय? अशी स्थिती आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील आणि भाजपचे सुभाषराव देशमुख यांच्यातच लढत होईल, असे जाणकारांचे मत असले तरी, मतदारांसह कार्यकर्त्यांमध्ये मात्र येथील उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर उद्याची निवडणूक नेहमीप्रमाणे सहजवार नेण्यासारखी नाही, याबाबत चर्चा होत आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्यानंतर प्रभाकर देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा उल्लेख होताना दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ मतदारसंघांतील उमेदवारांची यादी जाहीर झाली; पण माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अद्यापही गुलदस्त्यात असल्याने तालुक्‍यात उमेदवारीबाबत वरील तिघांच्या नावांची विविधांगाने चर्चा होत आहे.

माढा मतदारसंघात खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवारात होणार आहे. भाजपतर्फे २००९ मध्ये शरद पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले सुभाषराव देशमुख आणि संजय शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. तथापि राष्ट्रवादीमध्ये गटबाजी असल्याची चुणूक दिसून आली. मध्यंतरी फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते संवाद मेळाव्यात विधान परिषदेची निवडणूक लढविलेले शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला राडा राष्ट्रवादीतील गटबाजी दर्शवून गेला. त्यानंतर शरद पवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली, असे चित्र असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने उद्याची निवडणूक सहज व सुलभ नसल्याचे स्पष्ट 
आहे.

सर्वच राजकीय पक्षांतील वरच्या श्रेणीतील कार्यकर्ते सजग व सावधपणे उमेदवारीबाबत बोलताना दिसत आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे; पण अन्य विधानसभा मतदारसंघांतील चित्र काहीअंशी वेगळे असल्याचे राजकीय परिस्थितीतून जाणवते आहे. तथापि माढ्यातील राजकीय लढाई विजयसिंह मोहिते-पाटील आणि सुभाषराव देशमुख यांच्यातच होईल, असे आजचे चित्र आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Madha Constituency Issue Sharad Pawar Politics