Loksabha 2019 : मोहिते-पाटील यांची पक्षांतराची सातवी फेरी

Ranjitsinh-Mohite-Patil
Ranjitsinh-Mohite-Patil

तिसरी पिढीतही पक्षबदल; भाजपमध्ये उद्या प्रवेश
सोलापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या (ता. 20) मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मोहिते-पाटील घराण्यातून पक्षांतराची ही सातवी फेरी आहे. रणजितसिंहांचे आजोबा (कै.) शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासूनच पक्षांतराची किमया सुरू आहे.

(कै.) शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1952 मध्ये स्वतंत्र पक्षाकडून निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून 1957 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 1962, 1967 या दोन्ही निवडणुकांत (कै.) मोहिते-पाटील यांनी यश मिळवले; परंतु 1972 मध्ये निवडणुकीपासून ते दूर राहिले. जनता पक्षाच्या लाटेत 1977 मध्ये त्यांना जनता पक्षाचे उमेदवार (कै.) शामराव पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. (कै.) मोहिते-पाटील यांनी दोन वेळा पक्ष बदलला.

विजयसिंह यांनी 1980 मध्ये प्रथम अपक्ष म्हणून नंतर कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुका लढविल्या. 1999 मध्ये शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती केली. त्यात सर्वात शेवटी "राष्ट्रवादी'त प्रवेश करणारे विजयसिंह मोहिते-पाटील होते. त्यांनी 2004 मध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळवलेच. गेल्या चार वर्षांपासून त्यांचा भाजप प्रवेश होणार, अशा सततच्या वावड्या येत होत्या. त्याला आता पूर्णविराम मिळाला.

रणजितसिंह यांनी अकलूज ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवकच्या राज्य अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे दिली होती. त्यांच्या रूपाने भाजपतील प्रवेशाने मोहिते-पाटील कुटुंबीयाने पक्षांतर केलेला हा चौथा प्रयोग आहे. (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही दोन वेळा पक्ष बदलला. धवलसिंहांच्या रूपाने एकवेळा पक्षांतर झाले. अशा एकूण सात वेळा पक्षांतराची प्रकिया झाली.

पक्षांतरामागची अपरिहार्यच...!
- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्ज, विजय शुगरसमोरील अडचणी, सुमित्रादेवी पतसंस्थेतील गैरप्रकार अशा एकामागे एक आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे जाण्याशिवाय मोहिते-पाटील यांना पर्यायच नव्हता

- जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर सध्या सुरू असलेल्या कारवाईमध्ये बहुसंख्येने संचालक राष्ट्रवादीतील आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याची मोहीम होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com