Loksabha 2019 : वेदना दाबून सेनापती रणांगणात

मंद्रुळकोळे - प्रचाराला निघण्यापूर्वी आई व चुलतीची विचारपूस करून आशीर्वाद घेताना नरेंद्र पाटील.
मंद्रुळकोळे - प्रचाराला निघण्यापूर्वी आई व चुलतीची विचारपूस करून आशीर्वाद घेताना नरेंद्र पाटील.

ढेबेवाडी - निवडणुकीच्या रणांगणावर लढणारा नेता सेनापतीसारखाच असतो. विरोधकाशी दोन हात करताना प्रसंगी स्वतःचे दुःख, वेदना पाठीवर टाकून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना तो बळ देतो. सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्याकडे पाहिल्यावर सध्या त्याचीच अनुभूती येते. प्रचाराला निघताना पाय घसरून पडल्याने फ्रॅक्‍चर झालेल्या आपल्या वृध्द आईला शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करून श्री. पाटील रणांगणात लढत आहेत. निम्मा जीव आईकडे आणि निम्मा प्रचारात, अशा अवस्थेत वेदना दाबून त्यांची लढाई सुरू आहे.

माथाडी नेते (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या अकस्मात निधनानंतर वत्सलाताईंनी दुःख बाजूला सारून मुलांची जबाबदारी खंबीरपणे पेलली. माथाडी परिवारात माथाडींची माऊली म्हणून त्यांची ओळख आहे. वत्सलाताईंचे मुंबईपेक्षा गावाकडेच जास्त वास्तव्य असते. नरेंद्र व त्यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचे आईवर विलक्षण प्रेम आहे. नरेंद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून वत्सलाताई या प्रचारात व्यस्त होत्या. दररोज गावोगावी जावून माथाडी कामगार व मतदारांच्या गाठीभेटी घेत होत्या. गालावर आईच्या मुक्‍याचा गोडवा घेतल्याशिवाय व त्यांच्या पायावर डोके टेकवल्याशिवाय नरेंद्र हे कधीही घराबाहेर पडत नाहीत.

सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या धावपळीतही त्यांचा हा दिनक्रम चुकत नव्हता. सकाळी आईचा निरोप घेवून ते प्रचार दौऱ्यासाठी बाहेर पडल्यानंतर स्वतःही प्रचाराला निघण्याच्या तयारीत असतानाच घरात घसरून पडल्यामुळे वत्सलाताईंच्या पायाला फ्रॅक्‍चर झाले. मुंबईत लवकरच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाईल. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आईच्या उपचाराची पुढील व्यवस्था करून वेदना दाबून ते पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात सक्रिय झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com