Loksabha 2019 : अन्‌ सुशीलकुमारांना विजयाची खात्री

Sushilkumar-Shinde
Sushilkumar-Shinde

सोलापूर - वंचित बहुजन विकास आघाडीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ॲड. आंबेडकरांना सोलापुरातून लढण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी अकोल्यातून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसचे उमदेवार सुशीलकुमार शिंदे यांना आता विजयाची खात्री वाटू लागल्याची चर्चा आहे. 

लोकसभा निवडणुकीत सोलापूरसाठी भाजपकडून गौडगाव मठाचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे नाव निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. अक्‍कलकोट, सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या तालुक्‍यात लिंगायत समाज लक्षणीय आहे. परंतु, लिंगायत समाजातीलच काही पदाधिकाऱ्यांचा महास्वामींना विरोध असून, अनेक जण काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे महास्वामी नव्हे तर शिंदेच खासदार होतील; मात्र, ॲड. आंबेडकर असते तर शिंदे यांची पंचाईत झाली असती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com