Loksabha 2019 : तेरी भी चूप, मेरी भी चूप!

Javali-Vidhansabha-Constituency
Javali-Vidhansabha-Constituency

मेढा - राज्यासह देशात लोकसभेच्या निवडणुकीने वातावरण तापले असताना वसंतगडासह जावळी तालुक्‍यात कमालीची शांतता आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशीच सर्वत्र परिस्थिती दिसत आहे.

जावळी तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून सर्वत्र परिचित असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुका अधिकच मजबूत केला आहे. जावळीचे सुपुत्र व राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, पक्षाचे आजी-माजी पंचायत समितीचे सभापती, सदस्य, जिल्हा परिषदेच्या आजी-माजी सदस्यांमुळे जावळीत राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांचे नाव घोषित झाले असले तरी तालुक्‍यात चांगलीच चुप्पी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तर जोपर्यंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदेश देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही ‘जैसे थे’ स्थितीत राहू, अशा भूमिकेत दिसत आहेत. कोणतीही बैठक नाही, ना चर्चा नाही. शिवेंद्रसिंहराजेच आमचे नेते, आमचा पक्ष अन्‌ सर्वकाही अशा आशयाच्या ‘पोस्ट’ही सोशल मीडियावर भिरभिर फिरताना दिसत आहेत. 

तालुक्‍यात विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपतील अनेक प्रमुख कार्यकर्ते, नेते मंडळींबरोबर खासदार भोसले यांचे स्नेहाचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे विरोधकही चुपचाप आहेत. उदयनराजे पक्षाचे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले असले तरी जावळीतून मताधिक्‍यासाठी आमदार शिवेद्रसिंहराजे यांच्याबरोबर वाढणाऱ्या दृढ सबंधांवरच जावळीत त्यांना मताधिक्‍य शक्‍य आहे. त्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याबरोबर उदयनराजेंचे ताणलेले संबंध पुन्हा जुळवावे लागणार आहेत.

उदयनराजेंना मात्र जावळीत गोळाबेरीजच उपयोगाला येणार आहे. तरच जावळीचा गड उदयनराजेंसाठी सुखरूप ठरणारा आहे. त्यात विरोधी पक्षाची उमेदवारी शिवसेनेला की भाजपला, याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे विरोधी पक्षामधील कार्यकर्ता आजही संभ्रावस्थेत आहे. त्यात शिवसेनेला उमेदवारी मिळाली तर जावळीतून ज्येष्ठ नेते एस. एस. पार्टे गुरुजी इच्छुक आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त जावळी तालुक्‍यातील कोणीही उमेदवार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com