'पवारांनी बदलत्या काळाचे भान राखावे' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. युतीच्या निर्णयात ते सहभागी होते. त्यांनाही युती झाल्याचा आनंद आहे. आगामी काळात त्यांचे योग्य जागी पुनर्वसन होईल. धनगर समाज भाजपवर नाराज आहे का? असे विचारले असता, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे लवकरच धनगर समाज आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल. 
प्रकाश महेता, गृहनिर्माणमंत्री 

पंढरपूर : ""कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये असंतोष आहे. त्यातूनच शरद पवार यांच्या फलटणच्या सभेत "राष्ट्रवादी'मधील कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला. पवार यांच्या राजकीय आयुष्यात कधीच जे घडले नाही, ते त्यांच्या फलटणच्या सभेत घडले. तेथे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी वाद घातला. त्यामुळे काळ, वेळ, विचार आणि पिढी बदलली आहे, याचे भान आता पवार यांनी राखले पाहिजे,'' असा टोला राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी शनिवारी लगावला. 

मेहता आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. या वेळी त्यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देणार असल्याचेही महेता यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेना युती झाली आहे. ही युती कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता खुपू लागली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडी झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. आघाडी झाल्याचे द्योतक म्हणूनच फलटण येथील शरद पवारांच्या सभेत कार्यकर्त्यांनी राडा घातला. यावरून पवार यांनी बोध घेण्याची गरज आहे. या वेळी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते. 

एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. युतीच्या निर्णयात ते सहभागी होते. त्यांनाही युती झाल्याचा आनंद आहे. आगामी काळात त्यांचे योग्य जागी पुनर्वसन होईल. धनगर समाज भाजपवर नाराज आहे का? असे विचारले असता, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे लवकरच धनगर समाज आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल. 
प्रकाश महेता, गृहनिर्माणमंत्री 

एक हजार नागरिकांना विठ्ठल दर्शन 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री मेहता यांनी विधानसभा मतदारसंघातील अकराशे मतदारांना विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आणले आहे. यासाठी त्यांनी मुंबई ते कुर्डुवाडीपर्यंत रेल्वे आरक्षित केली आहे. पंढरीत त्यांच्या खाण्या-पिण्याची व राहण्याची बडदास्त देखील मंत्रिमहोदयांनी केली आहे. तुळजाभवानी आणि अक्कलकोट येथे दर्शन घेऊन ही मंडळी मुंबईला रविवारी (ता. 25) सायंकाळी रवाना होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Prakash Mehta talked about Sharad Pawar contest in Madha