Loksabha 2019: शहांवर टीका करताना शरद पवार यांची जीभ घसरली

Loksabha 2019: शहांवर टीका करताना शरद पवार यांची जीभ घसरली

सातारा : देशाचे निम्मे मंत्रीमंडळ बारामतीत प्रचाराला येऊन गेले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीत येऊन राष्ट्रवादीला उखडून फेकण्याची भाषा बोलली. तुम्ही मला काय उखडून टाकणार, असे बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचेे अध्यक्ष शरद पवार यांची जीभ घसरली. यावेळी शरद पवार यांनी अमित शहा यांची नक्कलदेखिल करून दाखवली.

शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलो आम्ही तुला असेच वाटलो का? आमच्या मातीत कोण आला आणि दम देऊ लागला, तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. अमित शहा उखड काय उखडायची ती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातार्‍यातील विराट सभेत भाजपला ललकारले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या मातीत येऊन उखडण्याची भाषा कोण करत असेल, तर ही माती त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांची सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला. पवार राष्ट्रवादीचे साताऱ्यातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com